Wednesday, 14 September 2011

कृपया जीएनयु / लिनक्स ला जीएनयु स्लाश लिनक्स असे म्हणा

कृपया जीएनयु / लिनक्स ला जीएनयु स्लाश लिनक्स असे म्हणा
जीएनयु / लिनक्स हि प्रणाली असून त्यातील कर्नल बनवणार्याचे नाव लिनस असून जीएनयू हे एका संस्थेचे नाव आहे. जीएनयु या संस्थेने जीएनयु / लिनक्स या प्रणालीतले ८५% योगदान दिले आहे, जीएनयु या संस्थेने जीएनयु / लिनक्स अशी बरीच software मोफत (copyleft /फ्री) ठेवली.

जीएनयु / लिनक्स चा उपयोग करून घरातील/कार्यालयातील कॉम्पुटर मशीन हाताळण्याची इच्छा असणार्यांनी झगडत असलेल्या प्रश्नांना प्रतिसाद स्वरुपात पाठवा

Tuesday, 13 September 2011

इंटरनेट प्रायव्हसी विषयीचे अज्ञान

प्रश्न जर अज्ञानाचा असेल तर ते ज्ञानी माणसांकडून घ्यावे. पण ज्ञानी माणूस भारोस्याला पात्र नसेल तर.
अणु उर्जेचा वापर योग्य व अयोग्य दोन्ही कामांसाठी होतो. पण हे लोकांवर तेवढेच अवलंबून असते कि तो वापर लोकांनी कसा करावा.
जपानचे उदाहरण घेतल्यावर अणु उर्जेने किती फायदा व नुकसान होते हे कळते.
पण अशा वेळी असे प्रश्न घेऊन बसने तेवढेसे योग्य नाही कि घराघरातील वापाराने किती घातक असू शकते ते.

 ज्यावेळी देशाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत असते त्यावेळी काही नादुरुस्त जणांचा  विचार करणे तितकेसे योग्य नाही.
कॉम्पुटर इन्जिनिअर'स ना मोठ्याप्रमानावर रोजगार उपलब्ध करणाऱ्या सर्व कंपन्या या जेव्हा सर्व माहिती एकाच ठिकाणी दुसर्याच्या हाती देऊन बेफिकारीने फिरत असतात एवढ्यावर सर्व संपत नसून देशातील सरकार हे अशा कंपन्यांच्या मागोमाग चालून आधार (UID) सारख्या प्रोजेक्टमधून आपल्या देशातील सर्व माहिती काही कंपन्यांच्या कॉम्पुतेरवर एकत्रित केली जाणार आहे. देशाती बर्याच संस्था मदत करण्याच्या नावाखाली एका धंद्याची माहिती दुसऱ्याला विकत असतात. अशा वेळी आधार (UID) मधून काय अपेक्षा ठेवावी.

सांगायचे तात्पर्य एवढेच कि इमारतीचा पाया हा कमकुवत असेल तर त्यातील सजावटीवर कितीही खर्च केला असता त्याच्या किमतीत जराही फायदा होणार नाही.
राष्ट्रीय सुरक्षिततेचा व राष्ट्राला चालवणाऱ्या महत्वाच्या कंपन्यांची धोरण जर चुकीची असतील तर राष्ट्रातील सामान्य माणसांपासून आपण काय अपेक्षा ठेवाव्यात हे आपण आपले ठरवावे.

Monday, 5 September 2011

संगणक बनवण्याची कल्पना विद्यार्थ्याची जो पुढे जाऊन एक उद्योजक झाला

जागतिक उत्पादन क्षेत्रातील यांत्रीकीकरणामुळे हातमाग मागासला याच यांत्रीकीकरणाला औतोमिज़तिओ चे स्वरूप देण्याच्या विचारांनी माहिती लिखित स्वरूपात साठवण्याची सोय केली. नंतर वेगळ करण्याचा प्रयत्न करत राहणार्या एका उद्योगी तरुणाने कागद वाचवण्याच्या दृष्टीने टंक लेखनाला दिस्प्लाय (diplay) उपलब्द करून दिला. यामुळे चुका करण्याच्या शक्यतांमध्ये क्रांती आली. दुसर्या बाजूला एका (digital music system) बनवला. या दोघना एकत्र करून माहिती साठवणाऱ्या उपकरण जोडून संगणकाची उभारलेली कल्पना अवतरली व पहिला टेबलावर राहील असा संगणक बनवला.
यानंतर अनेक उद्योजक या धंद्यात स्पर्धे साठी उतरली आणि जगभर संगणक पोहोचवला भरपूर पैसे कमावले आणि पण त्या पहिल्या उद्योजकाला जगात सर्वात जास्त मागणी मिळाली आणि खूप वर्षानंतर सुद्धा त्या उद्योजकाने सर्व उद्योजकांना पछाडून ठेवले सर्वात महाग, टिकाऊ, उत्तम कार्यक्षमता आणि मागणी असलेला "Apple Inc" म्हणून प्रसिद्ध झाला.


Sunday, 4 September 2011

माझी संगणक सल्लागारीत्ता

माझी संगणक सल्लागारीत्ता
संगणक (computer) शब्द कानी पडताच गणक (calculator) यंत्राची आठवण होणे शक्यता नाकारता येत नाही. कदाचित संगणक गणक यंत्राची सर्व कामे करीत असावा म्हणून संगणकाला संगणक असे नाव पडले असावे. परंतु जसे जसे सर्वाना संगणकाचा पुरेपूर वापर लोकांना कळला तेव्हा ते नाव योग्य नाही असेही वाटले पण आता जेव्हा संगणक (computer) हा आकाराने गणक यात्रा सारखा झाला तेव्हा हे नाव अतिशय विचार (दूर दृष्टी असलेल्याने ) करून ठेवले असावे असे वाटते.
सध्याच्या युगात सामान्य माणसाच्या मते संगणक म्हणजे मनोरंजनच साधन आहे ज्याचा वापर हळूहळू सर्व  वर्ग आता स्वतःच्या मिळकती साठी करू लागले आहे.
संगणक (computer) आणि माहिती तंत्रज्ञान (Information Technology ) या क्षेत्रात मागील २० वर्षात बरीच उलाढाल झाली. ती किती उपयोगाची होती व किती त्रासदायक होती हा प्रश्न न सुटणारा आहे.
संगणकाचा एक प्रकार शक्तीशाली संगणक (super computer) जो अंतराळात सोडलेल्या यानाची माहिती ठेवण्यासाठी केला पण यासाठी देशाला बाकी जगासमोर हात पसरावे लागु नायेत यासाठी भारतात काही वर्षातच बनवला. तरीही उत्पादनासाठी चीन सारख्या देशवार अवलंबून राहणे देशाने पत्करले. विजयाचा झेंडा झळकाव तसा शक्तीशाली संगणकानंतर  (super computer) आपण बरीचशी जबाबदारी न उचलता संगणकातील software खेत्रात क्रांती करायची ठरवली जसे नवरदेवाने लग्नाचा सुट घातला पण दोन दिवसापासुन अंघोळ करायाल मिळालीच नाही.
नवीन संगणकयाची कार्यक्षमता मोजण्याच व दोन संगणकांची तुलना कोणत्या आधाराव करावी?
असा प्रश्न पडताच मेमोरी हा शब्द आठवतो एक म्हणजे तत्काळ (RAM -रम  ) जी संगणक बंद करताच निकामी होते. दुसरी कायम  harddisk
महत्वाचा मुद्दा कार्यक्षमता (processing power) चा एका क्षणात किती डाटावर प्रक्रिया होऊ शकते  होऊ शकतो ते.
या सर्वांचा सोपा उदाहरण घ्यायचा झालं तर दळण करणार्याचे घ्या  (जो गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यांचे रुपांतर पिठात करून देतो तो )
गिरणीतील यंत्र क्षणात किती गव्हाचे पिठात रुपांतर करते ते (processing power)
यंत्रात किती गहू सामावू शकतात (RAM ) व गिरणीत एकूण किती किलो धान्य व पीठ सामावू शकत ते (Harddisk).
आता प्रश्न येतो संगणक प्रणाली (operating system) -खिडक्या
जी भारत देशातील जणू सर्वाना एकच माहित आहे. आणि त्या प्रणाली ला आपण नारळ आणि श्रीफळ देऊन त्यांना आपण पुजतच आहोत आणि संगणकातील सारे जग इथे येऊन संपून जाते असा विश्वास आपण मनाशी धरला कि घरात येण्याचा व बाहेर जाण्याचा मार्ग हा खिडकीतूनच असतो व घराला दरवाजे असू शकतात हे मानण सोडूनआच दिलं आहे. ह्याच त्या खिडक्यांतून वेगवेगळे चोर देशात शिरू पाहत आहे ह्याचा कुणी विचार करीत नाही.
देशात जेव्हा नवीन संगणकाची प्रथा सुरु झाली त्यावेळी संगणकाचे मूल्य हे कमीत कमी  रु ९००००/- च्या वर असून त्या विषयी ज्या गोष्टी चर्चेत होत्या त्या                                                 १) संगणक हाताळण्यासाठी घरात वातानुकुलीत यंत्रणा असावी लागते किंवा पंखा असावा.
२) राहणाऱ्या क्षेत्रातील विजेचे उतार चढाव हा उपद्रवी नसावा.
३) भारतात हवेत ओलावा (पाणी) असल्याचे आढळते.
४) त्यासाठी वेगळी मांडणी करावी.
५) चुम्बाकात्वाचा प्रभाव पडून display unit बाधित होऊ नये म्हणून sound system  व Display unit यांमध्ये अंतरावर असावे                                                                                        
६) प्रिंटर असल्यास नियमित प्रिंटींगचे काम करावे (शाईचा योग्य वापर नियमित होत राहावा नाहीतर शाई सुकून प्रिंटर खराब होण्याची शक्यता )
७) cd व floppy द्रीवे मध्ये एक disk असू द्यावी लेन्स झाकून राहावी म्हणून व धुळीपासून संरक्षण व्हावे.                                                                                                                          
८) लहान मुलांना हात लावू देऊ नये.